देवळा प्रतिनिधी : आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरील म्युझियम साठी २०१३ मध्ये किरीट सोमय्या याने निधी गोळा केला होता.पण तो राजभवनाकडे जमा केला नाही. त्या निधीचा परस्पर गैरव्यवहार झाला असुन, किरीट सोमय्या याने, तो निधी आपल्या बांधकाम व्यवसायाकरीता किंवा निवडणुक खर्चाकरीता वापरल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.या निधी संकलनाबाबत आरटीआय मधुन माहीती समोर आली आहे.
सदर निधी राजभावनाकडे जमा झालाच नाही, तर हा निधी गेला कुठे? कोणी खाल्ला? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहीजे, तसेच विक्रांतच्या नावाखाली निधी जमवुन गैरव्यवहार करुन सैनिकांच्या बलिदानाचा लिलाव करणाऱ्या किरीट सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी (दिं. ७) रोजी देवळा शिवसेनेकडुन उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरात घोषणाबाजी करून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना निवेदन सादर केले .
यावेळी संपर्कप्रमुख नवनाथ निच्चीत, तालुका संघटक बापु जाधव, ऊपतालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, ऊपशहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, नाजिम तांबोळी, देवा चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब आहेर, सतिष आहेर, विजय आहेर, विलास शिंदे, काकाजी पवार, खंडु जाधव, अभिमान शेवाळे, भास्कर पवार, भास्कर अहिरे, एस.के.शिंदे आदि शिवसैनिक उपस्थितीत होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम