अंगणवाडी सेविकांचे मोबाईल निकृष्ट दर्जाचे ; सेविकांचे ‘वापसी’ आंदोलन

0
157
देवळा येथे अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोबाईल वापसी आंदोलन प्रसंगी उपस्थित अध्यक्षा जिजाबाई अहिरराव समवेत सेविका (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : शासनाकडून (Goverment) तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेला मोबाईल फोन निकृष्ट दर्जाचे असून,संघटनेच्या वतीने अध्यक्षा जिजाबाई अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली वापसी आंदोलन करण्यात येऊन येथील महिला(woman) बाल विकास प्रकल्प कार्यालयात सर्व मोबाईल जमा करण्यात आले.

देवळा येथे अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोबाईल वापसी आंदोलन प्रसंगी उपस्थित अध्यक्षा जिजाबाई अहिरराव समवेत सेविका (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाकडून देवळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल फोन देण्यात आले. हे फोन निकृष्ट (खराब) दर्जाचे असून, या फोन(phone) मध्ये आलेले अँप इंग्रजीत असल्याने बहुतांश महिलांना ते हाताळता येत नसल्याची तक्रार संघटनेकडे या अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

भारत सरकारने डिजिटल(Digital) इंडियाची संकल्पना अमलात आणली आहे . या माध्यमातून ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना ऑन लाईन काम करण्यासाठी मोबाईल(Mobile) फोन देण्यात आले .या द्वारे सेविका अंगणवाडीत दाखल बालकांची जन्म तारीख,हजेरी, आहार वाटप ,व लसीकरण आदी सर्व माहिती संकलित करण्याचे काम करत आहेत. मात्र ,शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मोबाईल फोन निकृष्ट म्हणजे खराब दर्जाचे आहेत. यातील अँप इंग्रजीत असल्याने सेविकांना हाताळता जमत नाही.

अशी तक्रार सेविकांनी त्यांच्या संघटनेकडे केल्यानंतर याची दखल घेऊन (दि ३०) रोजी येथील प्रकल्प कार्यालयासमोर वापसी आंदोलन करण्यात आले . व सर्व मोबाईल फोन बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या तालुका अध्यक्षा जिजाबाई अहिररावसह मंगला सावंत, संगीता तांबे,सुनंदा थोरात,कलम आहेर,अलका जाधव ,अरुणा दुसाने ,पूनम चव्हाण, शुभांगी चव्हाण आदी सेविका उपस्थित होत्या.

शासनाने याची दखल घेऊन ऑन लाईन काम करण्यासाठी नवीन मोठा व उत्कृष्ट दर्जाचा मोबाईल फोन द्यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पनंतर्गत एकूण अंगणवाडीचे आठ बिट असून, यातील जवळपास २०० मोबाईल फोन कार्यालयात वापसी करण्यात आले. उर्वरित मोबाईल देखील जमा होतील . जिजाबाई अहिरराव , देवळा(Deola) तालुका अध्यक्ष अंगणवाडी संघटना


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here