द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्यात अजून एक संतापजनक घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने कॉलेजच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्या हाताला सिगारेटचे चटके दिल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक कॉलेजची विद्यार्थिनी बंडगार्डन भागातून रिक्षाने जात होती. त्यावेळी या रिक्षाचालकाने विद्यार्थिनीच्या हाताला स्पर्श करत अश्लील हावभाव केले. तसेच त्याने विद्यार्थिनीच्या हातावर सिगारेटचे चटके दिले. यामुळे संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित रिक्षाचालकाविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी हे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर करतात. रिक्षाने प्रवास करणे त्यांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटते. मात्र पुण्यात रिक्षाचालकानेच असे गैरवर्तन केल्याने, संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम