‘गिरणा’ कोरडीठाक कांदा पीक करपले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

0
7

देवळा प्रतिनिधी : गिरणा नदीपात्र गेल्या महिनाभरापासून कोरडेठाक पडल्याने या नदीच्या काठावर असलेला शेतकर्‍यांचे कृषी व्यवसाय विशेषतः कांद्याचे पिक तीव्र पाणी टंचाई मुळे करपले आहे. अशा विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय शेतकरी एकत्र येत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

शेवटच्या दोन पाण्याचा फटका बसल्याने पाण्याअभावी उभी पिके जळली असल्याने तसेच ,परीसरातील जनावरे ,पशुपक्षी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना पाण्या अभावी, ओस पडण्याच्या मार्गावर असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने प्रचंड नुकसान झालेले आहे.

कसमादे मध्ये कांदा हे प्रमुख पिक असुन त्याचे प्रचंड नुकसान झाले याला मुख्य कारण म्हणजे दोन पाण्याच्या आवर्तनातलेले वाढलेले ५० ते ५५ दीवसाचे अंतर आणि याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणारे दुर्लक्ष असुन या प्रश्नावर ते फारसे गंभीर नाहीत हि वस्तुस्थिती दिसत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. या बाबतीत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जनतेला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी येत्या शुक्रवारी आठ तारखेला सकाळी दहा वाजता लोहोनेर येथे ठिय्या आंदोलन व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

शेतकरी बांधव, नागरिक यांनी पक्षभेद विसरून पाणी हाच सर्वाचा पक्ष भविष्यात होणाऱ्या समस्येवर आजच एकत्र येऊन लढा उभा करण्यासाठी गिरणाकावरील जनतेनं एकत्र येऊन चणकापुर, पुणदचे पाणी सोडण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेकडो च्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन. विठेवाडी, भउर , बेज ,भादवण, बगडु, खामखेडा, पिळकोस, सावकी, लोहोणेर, ढेंगोढा, वासोळ महालपाटणे गांवाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासाठी शेतकरी संघटनेचे नेते देविदास पवार , शांताराम जाधव , पंडित बापू निकम, मांजर पाडा क्रुती समिती चे सदस्य दीनकर जाधव , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख लालचंद सोनवणे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट , प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार , रविंद्र शेवाळे ,रामक्रुष्ण जाधव, गजेंद्र चव्हाण , अतुल आहीरे , मजुर फेडरेशन चे संचालक सतीश देशमुख, निंबा धामणे , दिपक पवार, वसाका मजदुर यूनियनचे अध्यक्ष अशोक देवरे , धनंजय बोरसे , योगेश पवार संजय सावळे , नंदकिशोर निकम ,माणीक निकम राजु बोरसे अमर जाधव , कारभारी पगार, आंनदा लाडे, प्रविण आहीरे, आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती कुबेर जाधव किरण मोरे, पंकज बोरसे, धनंजय बोरसे, आदींनी दिली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here