चिंताजनक! महाराष्ट्रात आढळले कोविडच्या घातक ‘XE’ आणि ‘कप्पा’ व्हॅरिएंटचे रुग्ण

0
31

द पॉईंट नाऊ ब्युरो : कोरोनाच्या दोन नव्या व्हॅरिएंटने महाराष्ट्रात धडक दिली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत हे कोरोनाचे दोन नवे प्रकार आढळले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथे कोरोनाचे दोन नवे व्हॅरिएंट अर्थात XE आणि कप्पा या प्रकाराचे दोन रुग्ण मुंबईत आढळल्याने चिंता वाढली आहे. आत्ता कुठे महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊन निर्बंध हटवण्यात आले. मात्र आता या दोन नव्या प्रकारांनी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दरम्यान या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या Sero Survery मध्ये हे दोन रुग्ण आढळले. यात XE व्हॅरिएंटची लागण झालेला रुग्ण ही एक महिला आहे. जी फेब्रुवारी महिन्यात  आफ्रिकेतून प्रवास करुन आलेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आता कोरोनाची परिस्थिती सुधारून सारं काही पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे निर्बंध हटवले गेले आहेत. मास्क घालणे देखील ऐच्छिक करण्यात आले आहे.

निर्बंध हटवण्यात आले असले, तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आणि आता तर या दोन नव्या कोरोनाच्या प्रकारामुळे नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here