श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनजवळ स्फोट, एक ऑटो चालक ठार, TRF ने स्विकारली जबाबदारी

0
20

द पॉइंट नाऊ ब्युरो : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात एका ऑटोचालकाचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, जम्मू जिल्ह्याचा नोंदणी क्रमांक असलेल्या व्हॅनच्या चालकाने पार्किंग क्षेत्राजवळ वाहनाचा मागील दरवाजा उघडला तेव्हा हा स्फोट झाला.

लश्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात चुंबकीय आयईडीचा वापर करण्यात आल्याचे टीआरएफने म्हटले आहे.

अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी सुरक्षा दलांनी आज दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले. अंसार गजवतुल हिंदचा सफात मुझफ्फर सोफी ऊर्फ मुआविया आणि लष्करचा उमर तेली ऊर्फ तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरमधील खोनमोह भागातील सरपंचाच्या हत्येसह अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये दोघेही वाँटेड होते, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांनी अलीकडेच त्रालमध्ये तळ बनवला होता.

यापूर्वी 4 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी तीन हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून बिहारमधील दोन कामगार आणि एका काश्मिरी पंडितासह चार जण जखमी झाले आहेत.

सोमवारी मैसुमा भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांवर गोळीबार केला, ज्यात दोन जवान जखमी झाले. जखमींना SMHS रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी एक जवान – हेड कॉन्स्टेबल विशाल कुमार – मृत घोषित केला, तर दुसर्‍यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी, संशयित दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी 35 वर्षीय काश्मिरी पंडित बाल कृष्णन उर्फ ​​सोनू याला शोपियान जिल्ह्यातील छोटीगाममध्ये गोळ्या घालून जखमी केले. यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिहारमधील दोन मजूर जखमी झाले होते. पुलवामा जिल्ह्यातील लाजुरा येथे दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिहारचे रहिवासी पटलेश्‍वर कुमार आणि जाको चौधरी हे दोघे जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here