द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (पेठ) : पेठ-नाशिक मार्गावर ट्रकचा अपघात होऊन चालकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पेठ मार्गावरील कोटम्बि घाटात गुजरातकडून नाशिककडे फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा (MH 15, HD 5338) अपघात झाला.
हा ट्रक गुरातकडून नाशिककडे फरशी घेऊन निघाला होता. मात्र कोटम्बि घाटात या ट्रकने वळणावर कठड्याला धडक दिली आणि तो दरीत कोसळला. यात चालक सिद्धेश्वर भैरव यांचा दबून जागीच मृत्यू झाला.
ट्रकमध्ये भरलेल्या फरश्यांच्या वजनामुळे चेसिवरील सांगाडा अलग होऊन सिद्धेश्वर भैरव दबले गेले. नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम