स्वप्निल अहिरे
आराई प्रतिनिधी : आराई (बागलाण) येथील शेतकरी विलास रमेश भामरे यांची कन्या ॠतुजा विलास भामरे हिने आपल्या परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओपन प्रवर्गातुन राज्यात ५७ वी रॅकने उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. ऋतुजाच्या यशामुळे भामरे कुटूंबा बरोबरच आराई गावाच्या सुद्धा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भामरे कुटूंब हे फोफीर ता. बागलाण येथील, परंतु आजोबा आराई येथे वास्तव्यास असल्यामुळे येथेच स्थायिक भामरे परिवाराचा पारंपारीक शेती हा प्रमुख व्यवसाय. आजोबा दिवंगत देवराव पाटील हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिकचे संस्थापक संचालक व व्हाईस चेअरमन. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत सटाण्याचे पहिले संचालक अशी पदे त्यांनी भुषवली. तसेच वडील विलास भामरे हे बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाचे सदस्य असा सामाजिक व राजकीय वारसा ॠतुजाला लाभला.
यामुळेच लहानपणापासून देशसेवा व समाजसेवा करण्याची इच्छा मनात ठेऊन व आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपल्या मेहनतीच्या बळावर व अधिकारी होण्याच्या जिद्दीच्या जोरावर ऋतुजाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालुन मोठे यश मिळवले.
ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण सटाणा येथील मणिबाई अग्रवाल प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथे पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पुणे येथील जे.एस.पी.एम.वूमेन्स इंजिनिअरींग मधे पुर्ण करून इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर नोकरी न करता अधिकारी होउन देशसेवा करण्याची जिद्द मनात ठेऊन स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली व पुणे येथे युनिक अकॅडमी मध्ये प्रवेश घेत अभ्यासाला सुरवात केली.
आपले ध्येय जर साध्य करायचे असेल तर आपण त्या माध्यमातून तयारी केली पाहीजे. आपल्या डोळ्यासमोर आदर्श अशा व्यक्ती ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली व देशसेवेत आपला ठसा उमटवण्याची जिद्द ठेवत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आपल्यापासुन यश दुर राहत नाही व आईवडीलानी नेहमीच प्रोत्साहन दिल्याने मी हे यश संपादन करू शकली ”
– ऋतुजा भामरे
पोलीस उपनिरीक्षक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम