देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनिल खंडू आहेर यांची निवड

0
12

देवळा प्रतिनिधी : येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनिल खंडू आहेर, यांची तर उपाध्यक्ष पदी अनिल वनजी देवरे,समाधान राजाराम आहेर तसेच खजिनदार पदी प्रदीप विठ्ठल आहेर, सचिव पदी – नितीन भिवराज निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . देवळा पारंपरिक पद्धतीने( दि ३ मे) रोजी अक्षय तृतीया निमित्ताने येथील ग्राम दैवत दुर्गा माता यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते .

यासाठी सोमवारी (दि ४) रोजी शिवस्मारक परिसरात उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यात्रा उत्सवा निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी यात्रा समितीची स्थापना करण्यात येऊन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .

यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी अनिल आहेर , उपाध्यक्ष पदी अनिल वनजी देवरे , समाधान राजाराम आहेर, खजीनदार पदी प्रदिप विठ्ठलराव आहेर ,सचिव पदी नितीन भिवराज निकम यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी गटनेते संभाजी उर्फ संजय आहेर ,नगरसेवक अशोक आहेर ,करण आहेर,कैलास पवार , मनोज आहेर , माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , अमोल आहेर , देवा चव्हाण , बाळासाहेब आहेर , युवराज आहेर , योगेश वाघमारे , पंकज अहिरराव ,हिरामण आहेर , किशोर आहेर , मयूर आहेर , दिपक शिनकर , योगेश आहेर, दिलीप आहेर , दादाजी आहेर, काकाजी शिंद , चेतन आहेर ,अशोक आहेर , श्रावण आहेर , विश्वनाथ गुंजाळ ,रघु नवरे ,नाजीम तांबोळी आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .

दरम्यान , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती . यामुळे यात्रा ,जत्रा भरल्या नाहीत . आता कोरोना आटोक्यात आल्याने शासनाने सर्व निर्बन्ध शिथिल केले आहेत . यामुळे गावोगावी पारंपरिक सर्वच कार्यक्रम सुरू झाले आहेत . देवळा येथील यात्रा देखील यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा समितीने दिली . याची तशी तयारी देखील सुरू झाली आहे . यामुळे नागरिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . नूतन यात्रोत्सव संमतीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here