द पॉईंट नाऊ ब्युरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व विभागांच्या सचिवांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत देशाची परिस्थिती श्रीलंकेसारखी होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.
श्रीलंकेत सध्या मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे इथे आर्थिक आणीबाणी सुरू आहे. इथली सामान्य जनता रस्त्यावर उतरली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत लोककल्याण मार्गावरील कॅम्प ऑफिसमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकांना लुभावण्यासाठी राजकीय पक्ष मोफत योजना करत आहेत. मात्र यामुळे सदर राज्यांमधील आर्थिक परिस्थिती बिघडेल असे म्हणत, एक दिवस भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल अशी चिंता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्ष मतदारांना खुश करण्यासाठी किंवा लुभावण्यासाठी मोफत योजनांचा भडिमार करतात. मात्र या घोषणा व्यावहारिक नाहीत. राजकीय पक्ष करत असलेल्या या अव्यवहारीक योजनांच्या घोषणामुळे सदर राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती कमजोर होईल, असे म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम