भिकन शेख
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (पेठ) : इंधन दरवाढ ही आज भारतातील सामान्य नागरिकांची मोठी समस्या बनली आहे. देशात सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर पेठे येथे युवा सेनेतर्फे इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
पेठ येथे जुना तहसील चौकात युवा सेनेद्वारे थाळ्या वाजवून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम भारतात इंधन दरवाढीवर दिसून येत आहे. यामुळे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात आहे.
पेठ येथे याच कारणास्तव युवा सेनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, श्याम गावित, मनोज घोंगे, प्रकाश धुळे, सुरेश पवार, शीतल रहाणे, दुर्गा दरोडे, अरुण सापटे, भूषण कामडी, ललीत शिंगाडे, रघुनाथ वाडकर, पुरुषोत्तम गवळी, राहुल सातपुते, गणेश शिरसाठ, रफिक शेख आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम