– सोमनाथ जगताप
देवळा : जिल्हा कार्यक्षेत्र व व्यापारी बँके म्हणून नावारूपास आलेल्या येथील दि देवळा मर्चन्ट को – ऑप बँकच्या चेअरमन / व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक येत्या सोमवारी( दि ४)रोजी होणार आहे .
यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निंबधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली( दि . ४) रोजी दुपारी १२ वाजता बँकेच्या मिटींग हॉल मध्ये संचालक मंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे . बैठकीत संचालकांमधून निवडावयाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी खालीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रमानुसार कामकाज करण्यात येणार आहे . नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, नामनिर्देशन पत्राची छाननी, वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्दी , नामनिर्देशन पत्र माघार , दुपारी ०१.४५ अंतीम उमेदवाराची यादी जाहिर करणे ,मतदान प्रक्रिया , निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषीत करणे .याप्रमाणे आहे . देमको बँकेची पंचवार्षिक निवडणूक (दि ९) मार्च रोजी बिनविरोध पार पडली .
बिनविरोध निवडणूक आलेले नवनिर्वाचीत संचालक पुढीलप्रमाणे ; राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद शेवाळकर, जयप्रकाश कोठावदे ,योगेश वाघमारे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड,अनिल धामणे , मयुर मेतकर , डॉ प्रशांत निकम , योगेश राणे, हेमंत अहिरराव ,राजेश मेतकर, अमोल सोनवणे , नलिनी मेतकर , मनिषा शिनकर, कोमल कोठावदे, सुभाष चंदन याप्रमाणे आहेत .
चेअरमन पदासाठी माजी चेअरमन जयप्रकाश कोठावदे व कोमल कोठावदे यांच्या नावाची चर्चा आहे . चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले असून, सम्पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या चेअरमन पदी कोणाची वर्णी लागते हे पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे.
दरम्यान , जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी बँकेच्या चेअरमन पदासाठी इस्चुक असलेल्या कोठावदेद्वियांमध्ये असलेल्या मतभेदातुन समेट घडून आणल्याचे समजते . भारत कोठावदे हे केदा आहेरांचे खंदे समर्थक असल्याने कोठावदे यांच्या पत्नी कोमल कोठावदे यांची चेअरमन पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असुन , याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी याचे खरे चित्र स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम