डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या तर्फे वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालयास कुलर भेट

0
15
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचे पुतणे रोशन सुर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे व सहकाऱ्यांकडे वॉटर कुलर सुपूर्द केले. (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपले वडील स्व. नामदेवराव सखाराम सुर्यवंशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देवळा ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट दिले असून रूग्णालयात पिण्यासाठी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचे पुतणे रोशन सुर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे व सहकाऱ्यांकडे वॉटर कुलर सुपूर्द केले. (छाया – सोमनाथ जगताप )

तीन महिन्यांपूर्वीच डॉ . सुर्यवंशी यांनी देवळा ग्रामीण रूग्णालयाला दोन बेबी वार्मर मशीन भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली होती. हया वॉर्मर मशीनमुळे मुदतपूर्व जन्म झालेल्या बाळांवर वेळेत उपचार करणे सुलभ झाल्यामुळे नातेवाईकांची परवड थांबली आहे.
देवळा ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस, सिझर, अपघात विभाग, श्वान व सर्पदंश, प्रसुति विभाग, शवविच्छेदन, शस्त्रक्रिया विभाग आदी सुविधा चोवीस तास सुरू आहेत. यामुळे रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिवसभर वर्दळ सुरू असते. खाजगी रुग्णालयाचे उपचार न परवडणारे व परीस्थितीने गरीब असलेले रुग्ण मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयातील मोफत सुविधांचा लाभ घेतात. आता ग्रीष्म सुरू असून सुर्याचा प्रकोप झाल्यामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

देवळा शहरापासून रुग्णालय एक किमी अंतरावर असून अनेक रूग्णांना भर उन्हात रुग्णालयात पायी यावे लागते. रुग्णालयात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे, परंतु उन्हाळयात थंड पाण्याशिवाय तृष्णा शांत होत नाही. सर्वांनाच बॉटलचे थंड पाणी विकत घेणे परवडत नाही. डॉ. विजय सुर्यवंशी यांनी वॉटर कुलर भेट दिल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पिण्यासाठी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी व नागरीकांनी डॉ. सुर्यवंशी यांना धन्यवाद दिले आहेत.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश आहिरे,सहायक अधीक्षक विजयसिंह पवार, डॉ.युवराज खरे, पंडित शिंदें , विशाल माळी, श्रीमती वैशाली गायकवाड, प्रगती देवरे, शिवाजी गांजे, राकेश पवार आदी उपस्थित होते.

दोन वर्षापूर्वी कोरोनाचे आगमण झाल्यानंतर जनतेचा शासकीय आरोग्य सेवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. सर्व स्तरातील नागरीक आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत. अनेक दानशूर व्यक्ति मदतीसाठी पुढे येऊ लागल्यामुळे रूग्णांना त्याचा लाभ होत आहे.
– डॉ. गणेश कांबळे ( वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, देवळा )


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here