नितीन फंगाल
चांदवड प्रतिनिधी : नवीन वर्षाची सुरुवात अनेक शुभ कार्याने करत असतात अशा या शुभमुहूर्तावर गुढी उभारू आपला आनंद साजरा करत अनेक आनंद घेतांना आपण समाजात बघत असतो परंतु ,असेच शेतकऱ्यांमध्ये एक वेगळे आनंदाचे वातावरण दिसून येते आजच्या दिवशी शेतकरी पहाटेच आपले शेतात नांगर जुंपून शेत नांगरून वर्षाच्या सुरवातीचा पहिला दिवस शेतीत काम करून सुरवात करत असतो परंतु आताच्या शेतकऱ्यांमध्ये हे वातावरण दिसून येत नाही त्याची कारणे जर बघितली तर अनेक असून त्यात महत्त्वाचे कारण लाईट आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट कमी वेळ दिली जाते.
रात्र पाहट करून शेतकरी वर्गाला आपली पिके जगवावी लागत असल्यामुळे अशाच पहाटेच्या वेळी शेतकरी उर्धुळ ,दरसवाडी, देवरगाव या गावा लगत असलेल्या वाडी-वस्त्यांवर असलेले शेतकरी आपले शेताला पाणी देण्यासाठी गेले असता व परिवारातील काही सदस्य उन्हाळा दिवस असल्याने बाहेर झोपलेले असल्यामुळे एक पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल बारा व्यक्तींना चावा घेतला असून अनेक जखमा शरीरावर झालेल्या आहेत चेहऱ्यावर,हातावर,पायावर,छातीवर अनेक ठिकाणी चावा घेतल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एक लहान मुलगा गुढीपाडव्याच्या सणानिमित्त पाहुणा म्हणून आला असून त्याच्याही डोक्याला कुत्र्याने जबर चावा घेतल्यामुळे त्याला तब्बल दहा ते अकरा टाके पडले असून त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उर्धुळ येथील अरुण नवले 45, संजय नवले 45, स्नेहल नवले 10,हर्षदा नवले 8, मधुकर ठाकरे 35, सार्थक ठाकरे 14,आर्यन ठाकरे 8, गोकुळ पवार 30,सुदर्शन ठाकरे 14, दरसवाडी येथील सुनील बर्डे 44, ओम गवळी 4 वर्ष तर देवगाव येथील किशोर शिंदे 37, अशी संबंधित रुग्णांची नावे असून सर्वांना उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उपचार करण्यात आले.तसेच किशोर शिंदे यांनी नाशिक येथील जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेतल्याचे समजते, यावेळी चांदवड शहरातील प्रथम नागरिक भूषण कासलीवाल उर्दुळ येथील गणपत ठाकरे सागर आहेर उर्धुळ दरसवाडी येथील सरपंच व आदी नागरीक उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले रुग्ण अचानक वाढल्याने येथे डॉक्टरांची संख्या कमी असल्याने त्यांची धावपळ झाली अशा वेळेस तालुका उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांनी स्वतः हजर राहून संबंधित रुग्णांना बघणे गरजेचे असतांना देखील यांची उपस्थिती नसल्याने अनेक रुग्णांना नाराजी पत्करावी लागली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम