द पॉईंट नाऊ ब्युरो: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तेल कंपनी IOCL च्या ताज्या दरांनुसार, दिल्लीत पेट्रोलची नवीन किंमत 101.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 93.07 रुपये प्रति लीटर झाली आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 84 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 116.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 9व्यांदा वाढ झाली आहे.
यासोबतच देशातील इतर मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोलमध्ये 76 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरवाढीनंतर येथे पेट्रोल 107.45 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 97.52 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकाता शहराबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोलच्या दरात 83 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 96.22 रुपयांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आली आहे. असे असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत फेब्रुवारीमध्ये प्रति बॅरल $130 या सर्वोच्च पातळीवरून $103 पर्यंत घसरली, परंतु राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत.
चार मोठ्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल डिझेल
दिल्ली 101.81 93.07
मुंबई 116.72 100.94
कोलकाता 111.35 96.22
चेन्नई 107.45 97.52
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम