मुंबई प्रतिनिधी : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्ट तोडण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी प्रतिकात्मक हातोडा घेत दापोलीच्या दिशेने कूच केली आहे. परबांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे बांधण्यात आलेले रिसॉर्ट हे अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र आज त्यांना गर्दी जमवू नये म्हणून पोलिसांनी नोटीस दिली होती. या नोटीसीला पायदळीतुडवले म्हणून त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वाढली आहे.
पोलीस व सोमय्या ,राणे हे पोलिसांसोबत बोलत असून त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे, सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावर असून ते दापोलीकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी कशेडी घाट उतरल्यावर अडवले. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देऊ केली मात्र सोमय्या ठाम असल्याने पोलिसांसोबत जोरदार खडाजंगी होत वाद निर्माण झाला. नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे निघाले होते.
अनिल परब म्हणाले की ते रिसॉर्ट माझे नाही. यासंबंधी ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिकादेखील दाखल केली आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. असा आरोप परब यांनी केला आहे. रिसॉर्टवर ज्यांना रोजगार मिळतोय ते भयभीत झाले असून पुन्हा हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा परबानी दिला आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सोमय्या करत आहेत. हिंमत असेल तर तोडून दाखवा, ते फक्त नौटंकी करतात अस परब म्हणाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम