उर्जामंत्र्यांची घोषणा हवेतच; वीज तोडण्या सुरूच असल्याने ‘यांना शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची होती का?’ उपस्थित केला जातोय सवाल

0
15

द पॉईंट नाऊ ब्युरो : नुकतेच महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढील तीन महिने शेतकरी वर्गाची वीज कापली जाणार नाही, असे म्हटले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार एकट्या नागपूर आणि नगर जिल्ह्यात मिळूनच जवळपास 12 हजार ग्राहकांची वीज कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंत आधीच अवकाळी पाऊस आणि पडलेल्या शेतमालाच्या भावांनी त्रस्त शेतकरी काहीसा सुखावला होता. मात्र नितीन राऊत यांचे हे वक्तव्य नुसताच जुमला होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आत्तापर्यंत शेतकऱ्यांचीच नव्हे, तर नगर जिल्ह्यातच 5 हजार घरगुती ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. दरम्यान, महावितरणला आत्तापर्यंत 31 हजाराहून अधिक थकबाकीदारांकडून जवळपास 19 कोटींहुन अधिकची थकबाकी प्राप्त झाली आहे. मात्र ऊर्जामंत्री यांनी सांगितले असतांना देखील महावितरणचे कर्मचारी मात्र वीज कापून जात आहेत. राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले असले, तरी आमच्यापर्यंत लेखी आदेश आलेला नाही म्हणून महावितरण कर्मचारी सांगत आहेत.

यामुळे उर्जामंत्र्यांना नेमकी घोषणा करायचीच नव्हती, तर मग शेतकरी वर्गाची खिल्ली उडवायची होती का? असा संतप्त सवाल केला जात आहे. आधीच शेतमालाचे उतरलेले भाव, पाऊस यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गाद्वारे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here