नाशिक प्रतिनिधी : नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) मांजरगाव येथे लग्नघरी आलेल्या चुलतीवर पुतण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पोलिसांनी बलात्कारी नराधम पुतण्याला अटक केली आहे.
या संतापजनक घडलेल्या प्रकाराने समाज कोणत्या मार्गाला चाललाय हे दिसून येत असल्याचा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बु. येथील एक महिला (वय २८ वर्ष) ही मांजरगाव येथील लग्नघरी करंज्या व पुऱ्या बनवण्यासाठी आली होती. यावेळी महिला रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली असतांना, दबा धरून असलेला नराधम पुतण्या किरण वसंत दिवटे (वय २२, रा. शेणवड बु.) याने चुलतीला सांगितले की, तुझा नवरा दारू पिऊन अंधारात एकटाच पडला आहे. यावर फिर्यादीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन ती त्याच्या बरोबर नवऱ्याला पाहण्यासाठी अंधारात लांब गेल्यावर या पुतण्याने तिला एका खड्यात बळजबरीने खाली पाडुन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आहे.
नराधम किरण दिवटे याने तिला धमकी दिली की, याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला संपवून टाकेन. यानंतर या पिडीत महिलेने घडलेला सर्व प्रसंग घरी आल्यावर आरोपीची चुलती व त्याच्या आईला सांगितला. यावर त्यांनी सांगितले की, आपण लग्नघरी आहोत. तु आता गप्प बस घरी गेल्यावर चर्चा करू. घरी आल्यावर या महिलेने घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितल्यावर तिच्या नवऱ्याने आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेत थेट घोटी पोलीस ठाणे गाठुन फिर्याद दिली.
घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सदर महिलेची फीर्याद दाखल करून घेतली. यानंतर पुढील तपासासाठी पोलीस हवालदार शितल गायकवाड, अमोल केदार यांच्यासह पोलीस पथकाला मांजरगाव येथे घटनास्थळी पाठवुन दिले.
पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित किरण वसंत दिवटे याला अटक करुन घोटी पोलीस ठाण्यात आणुन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात किरण वसंत दिवटे याच्या विरोधात भादवि कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलीस कर्मचारी शितल गायकवाड, अमोल केदार आदी करीत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम