‘हेमिस्पेरिकल वॉटर हिटर’ या संशोधनाला एकाच वेळेस तीन देशात पेटंट

0
34

चांदवड प्रतिनिधी : येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकीच्या कु. रजत गोसावी, कु. रित्विक पाटील, कु. रितेश तिडके, कु. कुणाल तिडके या विद्यार्थ्यांनी डॉ.एम. एम. राठोड व डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेल्या हेमिस्पेरिकल वॉटर हिटर या संशोधनाला एकाच वेळेस अमेरिका, चीन आणि भारत या तिन्ही देशांत पेटंट दाखल झाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे यांनी दिली.

सद्यस्थितीत बाजारात इव्हॅक्युऐटेड ट्यूब कलेक्टर सोलर वॉटर हीटर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या प्रणालीतील उणिवांचा विचार करून तसेच सौर किरणांची एकत्रीकरण न करता ग्रीन हाऊस इफेक्टवर भर देत विद्यार्थ्यांनी हेमिस्पेरिकल वॉटर हिटर चे संशोधन केले आहे.

याचे वैशिष्ट्य म्हणजे हे वॉटर हिटर ईटीसी च्या तुलनेत कमी जागेत बसवता येते. त्याला खर्चही कमी येतो. तसेच सकाळ आणि संध्याकाळीही सौर ऊर्जेचा वापर होणे शक्य आहे. ईटीसी सोलर वॉटर हीटर ला देखभाल जास्त करावी लागते. त्या तुलनेत हेमिस्पेरिकल सोलर वॉटर हीटरला कमी देखभाल करण्याची गरज तसेच त्याचा शेडिंगचाही इफेक्ट कमी आहे.

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मल्टीपर्पज होलो हेमिस्पेरिकल सोलर कलेक्टर हे आगामी कालावधीत खूप उपयोगी ठरणार आहे. कमीत कमी वेळेत अन्नधान्य वाळवण्यासह विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यासाठी ते सहाय्यभूत ठरेल. इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता सोलर ड्रायर म्हणून ते काम करेल. त्याचा फायदा घरगुती व्यवसायिक इंडस्ट्रियल आणि कृषी क्षेत्रात चांगल्या प्रकारे करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यशस्वीतांचे संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा,उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा तसेच प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी,संस्थेचे तांत्रिक सल्लागार डॉ. आर. जी. ताथेड, विभाग प्रमुख डॉ. एस. डी. संचेती , सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here