महाराष्ट्र हादरला! 16 वर्षीय मुलाची लैंगिक अत्याचार करून हत्या करत गोणीत भरून फेकला मृतदेह

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (पुणे) : पुण्यात पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. कोथरूड येथे एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या पीडित मुलाला बोलण्याची समस्या होती. 21 वर्षीय नराधमाने या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून दिला. हा मृतदेह एकलव्य पॉलिटेक्निक मैदानाजवळ आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली.

हा 21 वर्षीय आरोपी हा पीडित मुलाच्या शेजारी राहत होता. या नराधमावर 302, 201, 364 आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मागील काही दिवसांत लैंगिक अत्याचाराच्या बऱ्याच घटना समोर आल्याने, पुणे हादरून गेले आहे. याआधी एका मुलीवर तिच्या वडील, भाऊ, आजोबा आणि मामाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. आता पुन्हा ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, 16 वर्षीय मुलाच्या या हत्येप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here