द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. जगभरात फैलावलेल्या डेल्टाक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा महाराष्ट्रासह भारतातील 7 राज्यांमध्ये शिरकाव झाला आहे.
कोरिया, चीन या देशांसह इतर काही देशांत कोरोनाच्या या नव्या व्हॅरिएंटने धुमाकूळ घातला आहे. त्यात आता भारतात देखील या व्हॅरिएंटने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्लीमध्ये या कोरोनाच्या नव्या प्रकाराने शिरकाव केला आहे. यामुळे आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
ओमीक्रॉन आणि डेल्टा हे व्हॅरिएंट एकत्र येऊन हा नवा व्हॅरिएंट तयार झाला आहे. भारतात आत्ताच कोरोनाच्या सर्व निर्बंधांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या व्हॅरिएंटच्या शिरकावाने शासन आता काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम