द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा खेळाडू महेंद्रसिंह धोनी पुढील वर्षी IPL खेळणार नाही. असं वक्तव्य माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा याने केले आहे.
आज IPL मधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधार पदाचा देखील महेंद्रसिंह धोनीने राजीनामा दिला. यामुळे सर्वच चाहत्यांना मोठा धक्का बसला. अचानकपणे केलेल्या या घोषणेने सर्वांनाच मोठा धक्का होता. त्यात आता चेन्नई सुपर किंग्स संघाचा आता रवींद्र जडेजा हा कर्णधार असेल, हे धोनीनेच स्पष्ट केले.
दरम्यान, धोनीने आता कर्णधारपद सोडले. याचा अर्थ तो पुढील वर्षी IPL खेळणार नाही. हे जवळपास निश्चित असल्याचे आकाश चोपडा म्हणाले. धोनीच्या या निर्णयाचे अनेक चाहत्यांनी स्वागत केले. तर अनेकांना धक्का देखील बसला.
आता महेंद्रसिंह धोनी हा IPL मध्ये देखील एक खेळाडू म्हणूनच खेळणार आहे. धोनी आता मैदानात केवळ एक खेळाडू म्हणूनच खेळणार आहे. याआधी IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या कर्णधार विराट कोहलीने देखील कर्णधारपद सोडले होते.
आता IPL मध्ये बऱ्याच टीम या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहेत. यामुळे IPL ला नक्कीच वेगळा रंग चढेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम