रोहित गुरव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (ताहाराबाद) : बागलाण तालुका पंचायत समिती येथे ताहाराबाद येथील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शिवसेनेचे बागलाण तालुका प्रमुख सुभाष नंदन यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताहाराबाद ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवलेल्या अधिकारी, सरपंच व सत्ताधारी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शिवसेनेचे बागलाण तालुका प्रमुख सुभाष नंदन हे 22 मार्चपासून बागलाण पंचायत समिती येथे उपोषणास बसले आहेत.
यादरम्यान रात्री 12:00 वाजेच्या सुमारास काही जणांनी नंदन व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात सुभाष नंदन तर बचावले मात्र त्यांचे सहकारी जखमी झालेले आहेत. सदर प्रकार हा बागलाण पंचायत समिती चे गट विकास आधिकारी कोल्हे व विस्तार आधीकारी सुर्यवंशी व सावंत यांच्या समोर घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा हल्ला करणाऱ्यांमध्ये प्रशांत सोनवणे, भाऊसाहेब नांद्रे, सरपंच शीतल नंदन यांचे पती योगेश नंदन व काही अज्ञातांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
बागलाण तालुक्याच्या ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीत सात विकासकामांमध्ये शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुरावे समोर आले होते. त्यातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नंदन उपोषणास बसले आहेत. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. आता दोषींवर काय कारवाई होते, यांची सगळे वाट बघत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम