देवळा प्रतिनिधी : खर्डे (वा.) ता.देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आदिवासी भागातील जनतेसाठी वरदान ठरणारे मुख्य केंद्र आहे. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रा.आ.केंद्र खर्डा व अंतर्गत 6 उपकेंद्र यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सर्व समस्या निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व आरोग्य यंत्रणा सक्षम राहिली आहे.
कोरोना महामारीत याच केंद्राच्या माध्यमातून अनेक नागरिकांना जीवनदान मिळालेले असून भविष्यातील गरज लक्षात घेता अत्याधुनिक, सर्व सोयीयुक्त व प्रशस्त इमारत व्हावी अशी जिल्हा परिषद सदस्या डॉ.सौ.नुतनताई सुनिल आहेर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा) आहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे मागणी केली, नवीन इमारत मंजुरीच्या दिशेने पाऊले टाकले आहेत.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदर केंद्राच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन मंजुर करून घेतले व नवीन इमारतीसाठी आरोग्य विभाग जि.प.नाशिक यांचेमार्फत प्रस्ताव मा.राज्यशासन यांना सादर करण्यात आला. सदर प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत पालकमंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे साहेब यांचेकडे प्रत्यक्ष भेटून नवीन इमारतीस मान्यता मिळणेबाबत आहेर दाम्पत्य यांनी विनंती केली असता मा.पालकमंत्री महोदय व मा.आरोग्यमंत्री महोदय यांनी लवकरच प्रा.आ.केंद्र खर्डे (वा.) ता.देवळा नवीन इमारतीस मान्यता देऊन पुढील प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या डॉ.नुतनताई आहेर यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डे(वा.) नवीन इमारत हे ग्रामीण भागासाठी वरदान ठरणारे महत्वाचे विकासकाम मार्गी लागेल अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम