विकास सोसायटी निवडणुकीसाठी सर्वत्र उत्सुकता ; तिसगावं सोसायटीसाठी सर्वाधिक ७४ अर्ज

0
31

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील कापशी ,भउर , तिसगांव व कुंभार्डे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी आज ( २१ ) अखेरच्या दिवशी येथील सहायक निंबंधक कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते .

सोसायटी निहाय प्राप्त अर्ज कंसात पुढीलप्रमाणे , कापशी ( ४५), भऊर ( ३५ ) ,तिसगांव ( ७४) , कुंभार्डे ( १४) याप्रमाणे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत . या अर्जाची उद्या मंगळवारी (२२ ) रोजी छानणी करण्यात येणार आहे , तर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध (२३ मार्च ), माघार(२३ मार्च ते ६ एप्रिल ), अंतिम यादी व चिन्ह वाटप (७ एप्रिल ), मतदान व मतमोजणी (१९ रोजी ) होणार आहे . अशी माहिती सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here