राष्ट्रउभारणीसाठी भावी पिढी सुदृढ असणं गरजेचं – केदा आहेर

0
42
देवळा : केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना मोफत ड्रायफ्रूटआहाराचे वाटप करताना भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर व इतर. (छाया - सोमनाथ जगताप )

सोमनाथ जगताप

देवळा प्रतिनिधी : नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील महारोजगार केंद्रातर्फे कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना मोफत ड्रायफ्रूट आहाराचे वाटप करण्यात आले. येथील महारोजगार केंद्राच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

देवळा : केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त
कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना मोफत ड्रायफ्रूटआहाराचे वाटप करताना भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर व इतर. (छाया – सोमनाथ जगताप )

केदा आहेर यांनी साधा वाढदिवस साजरा करण्याचे व गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार रोजगार केंद्राचे संस्थापक भाऊसाहेब पगार यांनी तालुक्यातील कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुकामेवा देत केदा आहेर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्री.आहेर म्हणाले की राष्ट्रउभारणीसाठी भावी पिढी सुदृढ असणे महत्वाचे आहे त्यादृष्टीने हा उपक्रम इतरांना प्रेरक आहे. युवा वर्गानेही कोणतेही व्यसन न करता मन, मेंदू आणि मनगट मजबूत करावे. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी प्रास्ताविक केले. नगरपंचायतीचे माजी गटनेते जितेंद्र आहेर, सुधाकर आहेर, अमोल आहेर, केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजीव पगार, सचिव दिनेश पगार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here