भारतीयांना लवकरच खुशखबर मिळणार! रशियानंतर आता इराणचीही भारताला खास ऑफर

0
45

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतातील नागरिकांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता अधिक दाट झाली आहे. आधी रशियाने कमी किमतीत इंधन खरेदी करण्याची भारताला ऑफर दिली. आणि आता इराणने देखील भारताला स्वस्तात इंधन खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

याआधी रशियाने ऑफर दिल्यानंतर भारतातील कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांनी स्वस्तात रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले. यात हिंदुस्थान पेट्रोलियमने 20 लाख कच्च्या तेलाचे बॅरल खरेदी केले. तर इंडियन ऑइलने 30 लाख बॅरल खरेदी केले.

रशियानंतर आता इराणने देखील भारताला स्वस्तात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. भारत हा 80 टक्के इंधन आयात करतो. इंधन आयात करणारा भारत जगातील एक मोठा देश आहे.

भारताने आता इराणकडून देखील स्वस्तात इंधन खरेदी केले. तर देशात वाढलेले इंधनाचे दर खूपच खाली येतील. यामुळे सामान्यांना मोठा फायदा होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here