द पॉईंट नाऊ ब्युरो : वाढदिवस जल्लोषात साजरा केल्याच्या रागातून मामाने भाच्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मालेगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल पवार या 29 वर्षीय युवकास त्याचा मामा माजी नगरसेवक भारत पवार आणि त्यांच्या साथीदारांनी घरात घुसून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात या युवकाचे घरचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, त्यांना देखील लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान याप्रकरणी राहुल पवार याने भारत चव्हाण, अजितसेन, करण आणि आनंद या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम