वाळू लिलावास पाच गावांचा तीव्र विरोध तर एका गावा बाबत संभ्रम

0
26
विठेवाडी ता देवळा येथे ग्रामसभेत वाळू लिलावास हात उंचावून विरोध दर्शवितांना ग्रामस्थ (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : गिरणा व कोलती नदीच्या वाळू स्थळांचा लिलाव झाल्यास येथील ग्रामस्थांचे जीवन उद्वस्थ होईल. म्हणून कुठल्याही परिस्थितीत या वाळू स्थळाचा लिलाव होऊ देणार नसल्याचा सूर खामखेडा, सावकी, भऊर, विठेवाडी, महालपाटणे या गावातील ग्रामसभेत उमटला. तर लोहणेर येथील काही तरुणांनी वाळू लिलाव करण्यात यावा, अशी मागणी केल्याने या गावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

विठेवाडी ता देवळा येथे ग्रामसभेत वाळू लिलावास हात उंचावून विरोध दर्शवितांना ग्रामस्थ (छाया – सोमनाथ जगताप )

गिरणा व कोलती नदी पात्रातील सहा ग्रामपंचायतीनी वाळू स्थळांच्या लिलावास विरोध दर्शवत तसे ठराव शासनाला पाठवले होते. या गावातील वाळू स्थळांचे लिलाव करण्यात ग्रामसभेने नकार नेमका कोणत्या कारणाने दिला. या बाबत उपविभागीय अधिकारी सी एच देशमुख यांचे अध्यक्षतेखाली या सहा गावात गुरुवारी( दि. १७) रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सर्वच गावांनी वाळू स्थळांचा लिलावाला तीव्र विरोध दर्शवला. वाळू लिलाव झाल्यास या परिसराचे खूप मोठे नुकसान होऊन हा बागायत भाग ओसाड होईल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होईल. या भविष्यातील सर्व गोष्टी उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांनी समजून सांगितल्या. तसेच कुठल्याही परिस्थितीत वाळू लिलाव होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केल्याचे ग्रामसभेत दिसून आले.

दरम्यान लोहोणेर येथे रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने, याला आळा बसावा म्हणून योगेश पवार यांनी वाळू लिलावास विरोध दर्शविला तर काही तरुणांनी वाळू लिलाव करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली. याविषयी महसूल विभागाने ग्रामस्थांची भूमिका जाणून घ्यावी असे मत व्यक्त केले. आता महसूल विभागाचे अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी विठेवाडीत झालेल्या ग्रामसभेत तलाठी धोंडगे , ग्रामसेवक सोनवणे , राष्ट्रवादी काँग्रेस मा अध्यक्ष पंडित निकम , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव , सोसायटी चेअरमन विलास निकम , भास्कर सुकदेव निकम, शशी निकम, राजेंद्र निकम , माणिक निकम , कैलास निकम , संजय निकम , मिलिंद निकम , पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते , उपविभागीय अधिकारी सी एच देशमुख , देवळा तहसील कार्यालयातील वरीष्ठ सहायक अधिकारी आहीरे, मंडळ अधिकारी राम परदेशी, स्थानिक तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ प्रत्येक गावात मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here