हॅप्पी ‘वर्ल्ड स्लीप डे’! म्हणजे हा ‘जागतिक निद्रा(झोप) दिवस’ नेमका काय? चला जाणून घेऊयात

0
44

द पॉईंट नाऊ ब्युरो : आज आहे वर्ल्ड स्लीप डे. आपण अनेक प्रकारचे डेज साजरे करतो. मात्र मार्च महिन्यातच हा ‘वर्ल्ड स्लीप डे’ येतो. झोपेचे महत्व लोकांना समजावे या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.

माणसाच्या आरोग्याशी निगडित झोप हा प्रकार जास्त झाला तरी वाईट आणि कमी झाला तरी वाईट. मात्र पुरेश्या प्रमाणात झोप घेणे तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने 7-8 तासांची झोप ही घ्यायलाच हवी. हे संशोधनातून देखील स्पष्ट झाले आहे. माणसाच्या शरीरास झोप पूर्ण मिळाली नाही. तर समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

तुम्हांला एक ठाऊक आहे?

‘वर्ल्ड स्लीप सोसायटी’ नावाची एक संस्था आहे. यातीलच काही संशोधक मंडळींनी मिळून 2008 सालापासून हा ‘वर्ल्ड स्लीप डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.

आणि माणसाला झोप ही पूर्ण मिळायलाच हवी. हे तितकेच खरे आहे. माणसाला पुरेशी झोप मिळाली नाही. तर रक्तदाब, डायबिटीज, लठ्ठपणा आणि हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता असते.

हो. पण खूप जास्त झोप देखील घातक आहे. जास्त झोप घेतली तट त्यामुळे फॅट्स, वजन, कफदोष वाढू लागतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून, मधुमेह होण्याची देखील शक्यता असते.

म्हणून सर्वांनी झोप घ्या. पुरेशी घ्या. पण जास्त ही झोप घेऊ नका.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here