सटाणा प्रतिनिधी : सटाणा शहरात विकासात्मक भर पडणार असून कायद्याची वास्तू नव्या रुपात समोर येणार आहे, सटाणा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या (new building) बांधकामाला मंजुरी (Construction approval) नुकतीच मिळाली आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून. याबाबतचा शासन निर्णय (Government GR) आज प्रसिद्ध करण्यात आला आहे तर लवकरच या कामाला सुरुवात देखील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सटाणा न्यायालयाची इमारत जुनी झाल्याने कामकाज करण्यात जागा कमी पडत असल्याचे सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.पंडित भदाणे अॅड.रवींद्र पगार तसेच नाशिक बार असोसिएशनचे सचिव अॅड.जालिंदर ताडगे यांनी सटाणा न्यायालय विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निवेदनाद्वारे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
सटाणा येथे नवीन विस्तारित न्यायालयीन इमारतीचे बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या नवीनन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली व या कामासाठी १० कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या नूतन इमारतीत दोन मजली वाहनतळ, गॅस पाईपलाईन, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रुफ टॉप, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा,आवरभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, मैदानाचा विकास, वाहनतळ, अंडरग्राउंड पाण्याची टाकी, पंप हाऊस, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम