द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपुर येथे एका 23 वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. नागपुर मधील सुराबर्डी जवळील म्हाडा क्वार्टर परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामला परिसरात एका खाजगी कंपनीत काम करणारी तरुणी ही मंगळवार पासून बेपत्ता होती. बुधवारी सायंकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. या तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचे सांगण्यात येत असून, याप्रकरणी तरुणीच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मागील काही काळात जाळण्याच्या घटनांनी महाराष्ट्र पूर्णतः हादरला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाला जिवंत जाळण्यात आले, त्यानंतर एका पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळले होते. आणि आता नागपुर येथील या घटनेने खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम