नाशिक प्रतिनिधी : रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मुंबई – नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात हिवाळा पॉईंटजवळ (Hiwala point) गहु भरलेला कंटेनर घाट चढत असताना एका मोठ्या वळणावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर संरक्षक भिंतीचे कठडे तोडून थेट २०० फूट दरीत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालक यात बचावला असून यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने चालकाच्या डोक्याला मार लागला असून तो जखमी झाला आहे.
हा अपघात भयंकर असल्याने घाटातील कठडे मोडले असून घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा घोटी टॅब केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी चालकास पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. डोक्याला मार जास्त असल्याने चालकास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम