महाराष्ट्रात पुन्हा लागू करण्यात आले नव्याने निर्बंध

0
149

द पॉईंट नाऊ ब्युरो : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. होळी आणि धुलिवंदन सण आला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता नवे निर्बंध घालण्यात आले आहेत.

रात्री दहाच्या आत सर्वांनी होलिका दहन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी डीजे लावला, तर त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर होळी दहन करतांना मद्यपान केलेले असेल अथवा गैरवर्तन केले तर कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आणि त्यामुळे कोणीही मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावू नये अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. असे झाल्यास देखील कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.

सणांच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे हे नवीन निर्बंध लागू करण्यात आल्याने नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here