खळबळजनक! 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना

0
60

द पॉईंट नाऊ ब्युरो : माणसाच्या वासनांध वृत्तीला काही सीमा राहिलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा एक खळबळजनक घटना घडली आहे. परभणी येथे एका 11 वर्षीय मुलावर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने या पीडित मुलावर एकाने अत्याचार केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक 11 वर्षीय मुलगा दर्गा रोड भागात खेळत असताना दगड लागून त्याच्या डोक्यास इजा झाली. या मुलाला दवाखान्यात उपचार करण्याच्या बहाण्याने सय्यद अन्सार सय्यद सईद हा एका हॉलच्या पाठीमागे बळजबरीने घेऊन गेला. त्यानंतर त्या पीडित मुलावर अत्याचार केले. ही घटना रविवारी घडली. मात्र ही बाब नुकतीच समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत महिला, मुलींवर अनेक वेळा अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता एका मुलावरच अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here