NET व JRF परीक्षा उत्तीर्ण चाचेर जि. प. शाळेचे शिक्षक अरविंद गोसावींचा सत्कार

0
32

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (कळवण) : देवळा तालुक्याच्या खुंटेवाडी गावचे भूमिपुत्र अरविंद केशव गोसावी हे NET व JRF परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा नुकताच कळवण तालुक्याच्या जिल्हा परिषद चाचेर शाळेत सन्मान करण्यात आला. गोसावी हे या शाळेत उपशिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

शिक्षक अरविंद गोसावी यांच्या लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपल्याने त्यांनी सर्व जबाबदारी पार पाडून हे सुयश संपादन केल्याने, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गोसावी यांच्या कुटुंबातील सर्वच बहुतांश सदस्य हे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. तर गोसावी हे एम. ए. बी. एड. असून, आता त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर NET-SET आणि JRF परीक्षेत देखील सुयश संपादन केल्याने, कळवणचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे, केंद्र प्रमुख मराठे आदींनी गोसावी यांचे अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here