भावडबारी घाटात अपघात ; बिहारमधील मजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
30

देवळा प्रतिनिधी : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रकचा अपघात घडला. या अपघातात बिहारमधील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. देवळा पोलिसांत मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

देवळा नाशिक राज्यमार्गावर पलटी झालेला ट्र्क व घटनास्थळी पहाणी करतांना पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,मंगळवारी ( १५ ) रोजी दुपारच्या सुमारास नाशिकहून देवळ्याच्या दिशेने कोंबडी खत घेऊन येणारा ट्र्क (क्रमांक एम एच १८ / ए ए ०३९९) भावडबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला . यात ट्र्क मधील मजूर जीतन भानू सहा (वय ४० रा बिहार राज्य ) हा दबला गेल्याने जागीच ठार झाला . घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व मयत मजूरला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . दरम्यान ,घाटात ट्रक उलटल्याची वार्ता परिसरात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. अनेकांनी वाहने वेडीवाकडी घाटात पार्क करत अपघात बघण्यासाठी हजेरी लावली. यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली होती.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी याठिकाणी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here