रशियाची भारताला स्वस्तात इंधन खरेदीची ऑफर; काय आहे यामागील कारण?

1
30

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि यासाठी थेट रशियाने भारताला ऑफर दिली आहे. रशियाने भारताला कच्चे तेल आणि युरिया स्वस्तात देण्याची ऑफर दिली आहे.

भारत आमच्याकडून डिझेल, पेट्रोल आणि युरिया स्वस्तात खरेदी करू शकतो. असे रशियाने म्हटले आहे. आणि भारताने देखील याबाबत विचार करण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याने रशियाच्या इंधन निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश देशांनी रशियाकडून इंधन निर्यात करणे बंद केले आहे. त्याचा परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

भारताचे रशिया अन अमेरिका या दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशियाच्या विरोधात संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव आल्यानंतर भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे एका बाजूला रशियाने भारताचे कौतुक केले. तर अमेरिकेने भारताच्या या भूमिकेवर नाराजी दर्शवली.

त्यामुळे रशिया भारताला या प्रकारे ऑफर देऊन आपल्या बाजूने खेचू पाहत आहे की मग रशिया आपल्या इंधन निर्यातीवर झालेला परिणाम कमी करू पाहत आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारत हा 80 टक्के कच्चे तेल निर्यात करतो. त्यातील 3 टक्के कच्चे तेल हे भारत रशियाकडून निर्यात करतो. भारतात इंधनाचे दर हे सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यामुळे भारताने रशियाची ऑफर स्वीकार केल्यास देशात इंधनाचे दर कमी होऊ शकतात. मात्र एका बाजूला भारताला अमेरिकेच्या भारताबाबत भूमिकेचा देखील विचार करावा लागणार आहे. यामुळे भारत आता नेमका काय विचार करतो? काय निर्णय घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here