द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली आहे, सर्वत्र मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. मात्र पर्यावरणाचा विचार करून युवा नेते आकाश पगार यांनी नाशिक शहरात वेगळी भूमिका घेतली आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने POPच्या गणेश मूर्तींवर बंदी जाहीर केली आहे. तसेच मा.उच्च न्यायालय यांनी देखील ही बंदी कायम ठेवली आहे. नुकतीच चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने देखील POPच्या मुर्ती विक्रीवर बंदी घातली आहे.
याच पार्श्वभूमीवर पीओपीच्या मुर्ती विक्रीवर बंदी घालावी तसेच नाशिक शहरात कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मुर्तीची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये अशी मागणी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, रोहित कळमकर, सिद्धांत आमले, सोनू जाधव, कोमल कुरकुरे, संकेत निमसे, सागर दरेकर, कैलास पाटील, रोशन अपसुंदे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम