भावडबारी घाटात ट्रक पलटी ; कामगाराचा मृत्यू

0
154

देवळा प्रतिनिधी : देवळा – सोग्रस रस्त्यावर भावडबारी घाटात अपघात झाला असून, या ठिकाणी ट्रक पलटी झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ट्रक वेगात असतांना वळणावर हा अपघात झाल्याचे समजत आहे.

भावडबारी घाटात अपघातात जितन भानू सहा (वय 40) सोनबर सहा ताहना हरसिद्धी जिल्हा मोतिहरी बिहार राज्यातील हा मजूर असून त्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

या अपघातानंतर बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. यामुळे काही वेळ वाहतुकीला खोळंबा झाला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here