सर्पदंशापासून दोघांचे प्राण वाचवले देवळा ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक

0
42

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : विषारी सर्पदंश झालेल्या दोन रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात आज गुरुवार (दि .२६) रोजी यशस्वी उपचार करत व तातडीने कृत्रिम श्वासोच्छवास देत दोघींचे प्राण वाचवण्यात यश आल्याने येथील डॉक्टर टीमचे कौतुक होत आहे.

पिंपळगाव (वा.) ता.देवळा येथील मोहिनी राहुल वाघ (वय ३५) यांच्या डाव्या पायाला सर्पदंश झाल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले त्यावेळी त्यांची श्वसनयंत्रणा कमजोर झाली होती. यामुळे त्या बेशुद्धावस्थेत गेल्या होत्या. येथील देवळा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गणेश कांबळे यांच्यासह डॉ.पाडवी, डॉ.डी.ए.देवरे यांनी तातडीने श्वसनाची नळी टाकत आम्बोबग पंपने कृत्रिम श्वासोच्छवास सुरु केला. आणि लगेचच सर्पदंशावरील वीस इंजेक्शनांसह एएसव्ही व निओस्टीगमीन औषधे दिली. यामुळे सापाच्या विषाची मात्रा कमी होत रुग्ण बेशुद्धावस्थेतून बाहेर पडण्यास मदत झाली. सदर रुग्णाचा धोका टळला असून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे संदर्भित करण्यात आले.

असाच दुसरा रुग्ण आनंदी सुनील आहेर (वय ५) हिच्या डाव्या हाताला सर्पदंश झाल्याने व तेथे सूज येत ती बेशुद्धावस्थेत गेल्याने आज सायंकाळी चार वाजता ग्रामीण रुग्णालयात आणले. तिच्यावरही असेच यशस्वी उपचार करत व कृत्रिम श्वासोच्छवास देत तिचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांवर येथे यशस्वी उपचार मिळू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश, श्वानदंश, प्राणीदंश यांच्या मुबलक लशी उपलब्द असल्याने अशा रुग्णांना तातडीने येथे आणावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मंदिरात बसवणे, मांत्रिक उपचार करणे टाळत लवकर रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून योग्य उपचार वेळेवर करता येतात.”.
-डॉ.गणेश कांबळे , वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवळा

“सर्पदंश झालेल्या व्यक्तींवर उपचार करत त्यांना वाचवण्याचे काम डॉक्टर्स करत आहेत. ते देवदूताची भूमिका पार पाडत आहेत.”
_भगवान आहेर देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here