देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील कापशी, भऊर, तिसगांव ,कुंभार्डे , खालप ,शेरीवार्शी , चिंचवे ,महालपाटणे या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी ( सोमवार दि १४) रोजी दोन टप्यात घोषित केला आहे .
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सहकारी संस्थाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे कापशी ,भउर ,तिसगांव ,कुंभार्डे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी – सुजय पोटे ,सहाय्यक निबंधक , अनिल पाटील , विनय देवकर , नीतीन तोरवणे , कांतीलाल गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे .
उमेदवारी अर्ज दाखल करणे ( १४ ते २१ मार्च सकाळी११ते ३) , छाननी (२२ मार्च सकाळी ११ वाजता ), वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध (२३ मार्च ), माघार(२३ मार्च ते ६ एप्रिल सकाळी ११ते ३), अंतिम यादी व चिन्ह वाटप (७ एप्रिल ), मतदान (१९ एप्रिल सकाळी८ते ४ ), मतमोजणी व निकाल मतदान संपल्यावर लगेच याप्रमाणे.
तर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सहकारी संस्था पुढीलप्रमाणे खालप ,शेरी वार्शी , चिंचवे , महालपाटणे यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे (१६ ते २३ मार्च ) ,छाननी (२४ मार्च ),उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे (२५ मार्च ),माघार (२५ ते८ एप्रिल ), अंतिम यादी व चिन्ह वाटप (११ एप्रिल) ,मतदान (२३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ४) मतमोजणी व निकाल मतदान संपल्यावर लगेचच होणार आहे .
विकास संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने संबंधित गावांत राजकीय घडामोडी सुरू झाल्या असून, इच्छुकांनी सभासदांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला आहे . पॅनल निर्मितीसाठी नेते सक्षम उमेदवार शोधण्यासाठी व रणनीती ठरविण्यासाठी बैठका घेत आहेत . बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी देखील प्रयत्न होणार असल्याचे चित्र दिसून येत असून , निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे .
दरम्यान , पहिल्या टप्प्यातील घोषित खर्डे ,पिंपळगाव वाखारी ,दहिवड ,मेशी येथील विकास संस्थांच्या निवडणुकीसाठी सोमवारी ( दि १४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहायक निबंधक कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून आली . गावं निहाय कंसात प्राप्त उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे खर्डे विकास (५४) ,पिंपळगाव वाखारी विकास -( २३ ),दहिवड विकास ( ४६) , मेशी विकास (३७) याप्रमाणे , दाखल अर्जांची उद्या मंगळवारी ( १५) रोजी छाननी होणार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम