दारूने केला त्याचाच घात; रागाच्या भरात आईनेच व्यसनी मुलाच्या डोक्यात वीट घालून केली हत्या

0
86

द पॉईंट नाऊ ब्युरो : दारू ही माणसाला संपवते हे खरेच आहे. याच दारुच्या पायी एका तरुणाची त्याच्याच आई अन भावाने डोक्यात वीट घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत शुभम नानोट हा आपल्या आई आणि पत्नीसोबत नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत राहत होता. मागीलच महिन्यात लग्न झालेला शुभम हा दारू पिऊन घरी नेहमीच वाद घालू लागला होता. यामुळेच त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

शुभम असाच एक दिवस दारू पिऊन आल्यानंतर आईकडे पत्नीच्या सोनोग्राफीसाठी 5 हजार रुपये मागत होता. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने घरात तोडफोड केली. यामुळे रागात येऊन आईने त्याच्या डोक्यात वीट घातली. नंतर आईने त्याच्या भावासोबत मिळून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मात्र शुभमच्या डोक्याला इजा आणि गळा आवळल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी आई आणि भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस तपासात अजून काय समोर येते हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here