किडनी दान करणाऱ्या किडनी दात्याचा आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते सत्कार

0
60

चांदवड प्रतिनिधी : जागतिक किडनी दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते सागर लॉन्स औरंगाबाद येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सिग्माचे डॉ.उमेश टाकळकर, डॉ.अजय रोटे , डॉ.नेहा जैन डॉ.शोहेब हस्मी , डॉ. वीरेंद्र वडगावकर, डॉ. सचिन सोनी डॉ.श्री गणेश बर्नला, डॉ. प्रदीप शारुख उपस्थितीत होते.

यावेळी कलम नयन बजाज मधील नोफ्रो.डॉ श्री गणेश बर्नला यांनी किडनी प्रत्यारोपण केल्या नतर घ्यावयाची काळजी व किडनी खराब होऊ नये या बाबत मार्गदर्शन केले व डॉ. सोनी यांनी किडनी हा अवयव किती महत्वाचा आहे आणि त्याचे कार्य कसे या बाबत मार्गदर्शन केले यावेळी सर्व किडनी दाते उपस्थितीत होते.

इतरासाठी जगले पाहिजे….!
श्री टोपे म्हणाले आपली संताची भूमी आहे ,आपण इतरासाठी जगले पाहिजे दोन किडनी असली तरी एकावर जगता येते त्यामुळे आपल्या च गरजवंत नातेवाईकांनाका द्यावे मी सुद्धा अवयव दान करणार आहे. या बाबत प्रक्रिया सुलभ केल्या पाहिजे त्यासाठी कागत पत्राची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल अशी ग्वाही आरोग्य मंत्री यांनी दिली तसेच महाराष्ट्र राज्यात अवयव दानात देशात पहिला क्रमांक आहे . ५००० किडनी पेसेंट आजून अवयव मिळण्याच्या च्या प्रतीक्षेत आहे. तरी अवयव दान हे खूप मोठे श्रेष्ठ दान आहे असे या वेळी टोपे म्हणाले.

मी स्वता एक मुलाचा पिता होतो म्हणून मी तर किडनी दिली. परतू या कार्यकमात सासू ने सुनेला . दिराने वाहिनीस, सासर्याने सुनेस असे किडनी दान केलेले किडनी दाते बघितले हि बाब खूप कैतुकांस्पद आहे. मी या जागतिक किडनी दिना निमित्ताने सर्वना आह्वान करतो कि आपण या अवयव दान मध्ये सामील होऊन आपल्याच नात्याला जीवन दान द्यावे. हा आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल dr श्रीगणेश बर्नला सर व सर्व टीम मी सर्व किडनी दाते याच्यातर्फ खूप आभार मानतो.
बाजीराव गयाजी शिंदे , किडनी दाता
नांदूर खु. नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here