महापालिका निवडणूक एक सदस्य वॉर्ड पद्धतीनेच होणार

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने आज महापालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत. 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या राज्यातील दहा महापालिकांसाठी एक सदस्य पद्धतीनुसार 2011 च्या जणगणनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. यामुळे आता बहुसदस्य पद्धत नसेल तर एक्सदस्य पद्धत असणार आहे .

घटनेच्या अनुच्छेद 243 के व 243 झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणुकांचे अधिक्षण संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते. संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1959 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे काही महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सन 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या महानगरपालिकांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर पूर्ण करणे महत्वाचे असेल. त्यामुळे दहाही महापलिकेच्या आयुक्तांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार 31 डिसेंबर, 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, 2019 अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे.

त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सोबतच्या परिशिष्ट अ, ब व क मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here