मित्राला सोडण्यास गेलेल्या चौघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

0
37

द पॉईंट नाऊ ब्युरो : जळगाव मध्ये एरंडोल येथे भयानक अपघात घडला आहे. ट्रक आणि कारच्या अपघातात 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रक उभी असतांना भरधाव कारने त्यास धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या एकास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी भयानक होती की, यात कारचा पूर्णतः चुरा झाला आहे. मृत्यू झालेले चाळीसगाव तालुक्याच्या जामडी येथील होते. मृत्यू झालेल्यांमध्ये एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरचा देखील समावेश आहे.

हे सर्वजण जळगाव येथे आपल्या मित्राला सोडण्यास जात होते. हा अपघात एरंडोल गावाच्या पिंपळकोठा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here