द पॉईंट नाऊ ब्युरो : ज्या लॅबमधून कोरोना पसरला ती चीनमधील लॅब मायक्रोसॉफ्टचे संचालक बिल गेट्स यांच्या मालकीची असल्याचा खळबळजनक आरोप समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान प्रांतातील लॅबमधून पसरला. यामुळे जगभरातून चीनवर आगपाखड करण्यात आली. चिनमुळे संपूर्ण जगाला मोठी डोकेदुखी झाल्याने सर्वांनी चिनाला फैलावर घेतले. मात्र वुहान मधील ती कोरोना पसरवणाऱ्या त्या लॅबचे मालक मायक्रोसॉफ्टचे संचालक बिल गेट्स असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे.
आंतरराज्य मजूर स्थलांतर कायद्याबाबत कामगार आयुक्तांची पुणे येथे भेट घेण्यास आलेल्या असतांना, मेधा पाटकर यांनी हे गंभीर आरोप बिल गेट्स यांच्याबाबत केले आहेत. तसेच बिल गेट्स फाउंडेशनने संपूर्ण जगातील शेतीवर कब्जा करण्याचा डाव असल्याचा देखील आरोप पाटकर यांनी केला आहे. त्यांनी बिल गेट्स फाउंडेशनच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम