देवळा प्रतिनिधी : देवळा येथील सहकारातील अग्रगण्य असलेल्या देवळा मर्चंट को ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत छाननी नंतर एकूण १७ पैकी १६ जागांसाठी ४० उमेदवारांचे अर्ज वैध झाले असून, अनुसूचित जाती जमातीच्या एक जागेसाठी एकमेव अर्ज आल्याने ती बिनविरोध झाल्याची फक्त औपचारिकता बाकी .
बँकेच्या एकूण १६ जागांसाठी निवडणूक होत असून, यात सर्वसाधारण गटातून १२ ,महिला प्रतिनिधी २, इतर मागास प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती जमाती १ अशा एकूण १६ जागांसाठी निवडणूक होत असून, सत्ताधारी पॅनलचे जयप्रकाश कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तर दुसरीकडे नितीन शेवाळकर यांच्या नेतृत्वाखाली दुसरा पॅनल होईल . अशी सभासदांमध्ये चर्चा आहे . परंतु निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असून, सत्ताधारी पॅनल विरोधी गटाला किती जागा देतात का ? समोरासमोर निवडणूक होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .
माघारीच्या अंतिम तारीख ९ मार्च असून, माघारीच्या कालावधी जास्त असल्याने निवडणूक बिनविरोध होते की तिला वेगळा रंग येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम