चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा

0
23

चांदवड प्रतिनिधी : येथील नॅक मानांकित ‘ अ ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे उपस्थित होते. याच दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेचे माझ्या जीवनातील महत्त्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत सुदर्शन पेंढारी, हेतवी शहा, साईनाथ डमरे, कल्याणी भोसले, हर्षा जैन व शुभम उगले या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विचार मांडले. या प्रसंगी सर्वांनी मराठी भाषेचे आपल्या जीवनातील महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवुन दिले. सदर कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल डॉ. एम. बी. केदार, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. एस. एस. ठाकरे यांनी केले.

ग्रंथालय सहाय्यक गुजराथी एस. व्ही., शेळके वाय. आर. तसेच कोकंदे बी. एस. व ठोके आर. सी. आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. श्रद्धा बच्छाव हिने केले.

सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा,उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी कोकाटे, उपप्राचार्य डॉ.एम आर संघवी, सर्व विभागप्रमुख , प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here