देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात शिवसेनेची परिस्थिती बिकट असल्याचा फायदा सर्वच घेत आहेत. तालुका शिवसेना बेभरोसे असल्याने चक्क सेना कार्यालयातील खुर्ची व टेबल गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यांत सत्तेत आल्यानंतर सेनेला प्रत्येक तालुक्यात कार्यालय देण्यात आले होते. हे कार्यालय आता रसवंती गृहाच्या आड गेल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील सेनेचे अस्तित्व संपुष्टात आलेले असतांना आता कार्यालयही संपुष्टात आल्याचे चित्र आहे. सेनेच्या कार्यालयातील खुर्ची व अन्य साहित्य नेमकं चोरीस गेले की एखाद्या पदाधिकाऱ्यांने साहित्य कुठे नेले मीटिंगसाठी, की अन्य काही झाले याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असतांना सेनेची ही बिकट परिस्थिती देवळा तालुक्यात का झाली याकडे जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी लक्ष देने गरजेचं आहे.
मंत्री भुसेंना कर्तव्याचा विसर …?
मालेगाव शेजारील सटाणा, देवळा, कळवण, या तिनही तालुक्यांमध्ये शिवसेना आजच्या घडीला चांगल्या स्थितीत अपेक्षित असतांना भुसेंनी कृषिमंत्रीपद घेत असतानाच या तालुक्यातील शिवसेना का संपली याकडे मंत्री भुसेंनी लक्ष का दिले नाही याची चर्चा देखील आहे. भुसेंनी ठरवले असते तर तीनही तालुक्यात ते सेनेला चांगले दिवस आणू शकले असते मात्र त्यांनी मंत्रिपद घेत असतांना सेनेला जिल्ह्यात वाढवण्यासाठी प्रयत्न कमी पडत असल्याचे स्पष्ट आहे. शिवसैनिक या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतांना त्यांच्या भावनांशी खेळण्याचे काम पदाधिकारी करत असून सेनेची अवस्था न घर की न घाट की अशी झाली आहे.
निंदनीय प्रकार वरिष्ठांनकडे तक्रार करणार – आढाव
शिवसेना कार्यालयातील साहित्य अगदी बाळासाहेबांचा फोटो देखील गायब झाला असून याची तक्रार वरिष्ठांकडे करणार आहोत, ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवु.
– मुन्ना आढाव , शिवसैनिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम